🔐 Study Max Marathi Test Log In
पोर्टलवरील टेस्ट Paid व Password Protected आहेत.
जर तुम्ही टेस्ट सिरीजचे सदस्यत्व (registration / subscription) घेतले असेल, तर कृपया User ID आणि Password टाकून "Start Test" बटणावर क्लिक करा.
सदस्यत्व घेतले नसेल व टेस्ट सिरीजचे स्वरूप पाहायचं असेल तर,
खालील "Demo Test" पर्यायावर क्लिक करून एक मोफत टेस्ट सोडवू शकता.
हा उपक्रम जर उपयुक्त वाटला तर, तुम्ही Subscription घेऊ शकता.
सदस्यत्वाची (registration / subscription) प्रक्रिया जाणून घेण्यासाठी
"How to Subscribe" बटणावर क्लिक करा.
जर तुम्ही टेस्ट सिरीजचे सदस्यत्व (registration / subscription) घेतले असेल, तर कृपया User ID आणि Password टाकून "Start Test" बटणावर क्लिक करा.
सदस्यत्व घेतले नसेल व टेस्ट सिरीजचे स्वरूप पाहायचं असेल तर,
खालील "Demo Test" पर्यायावर क्लिक करून एक मोफत टेस्ट सोडवू शकता.
हा उपक्रम जर उपयुक्त वाटला तर, तुम्ही Subscription घेऊ शकता.
सदस्यत्वाची (registration / subscription) प्रक्रिया जाणून घेण्यासाठी
"How to Subscribe" बटणावर क्लिक करा.
Time Spent: 0 min 0 sec
1. महाराष्ट्रातील विविध भागांत लोकजीवनात कोणत्या कारणामुळे विविधता दिसून येते?
स्पष्टीकरण: महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितींमुळे प्रत्येक भागातील लोकजीवन, अन्न, वस्त्र, घरांचे प्रकार आणि व्यवसाय यामध्ये ठळक भेद दिसतो.
2. कोकणातील लोकजीवन महाराष्ट्रातील पठारी भागातील लोकजीवनापेक्षा कशामुळे वेगळे आहे?
स्पष्टीकरण: कोकणाची भौगोलिक रचना, किनारपट्टी, पाऊस व जीवनमानामुळे ते पठारी महाराष्ट्रापेक्षा वेगळे आहे.
3. कोकणातील पोशाख, घरांचे प्रकार, अन्न, राहणी, व्यवसाय यात मुख्यत्वे काय दिसून येते?
स्पष्टीकरण: कोकणात भौगोलिक परिस्थितीनुसार पोशाख, घरांची रचना, अन्न, राहणी, व्यवसाय यात विविधता आढळते.
4. कोकणात मुख्यतः कोणते धान्य पिकते?
स्पष्टीकरण: भरपूर पावसामुळे कोकणात तांदूळ हे मुख्य पीक आहे.
5. कोकणातील लोकांच्या जेवणात मुख्य अन्न कोणते असते?
स्पष्टीकरण: तांदळाचे उत्पादन जास्त असल्याने भात हे मुख्य अन्न आहे.
6. कोकणातील जेवणात तांदळाव्यतिरिक्त कोणत्या पदार्थांचा समावेश असतो?
स्पष्टीकरण: विविध प्रकारच्या भाकऱ्या, आमटी, डाळी, उसळी, भाजीपाला यांचा समावेश असतो.
7. कोकण किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांच्या आहारात कोणत्या पदार्थाचे प्रमाण जास्त असते?
स्पष्टीकरण: किनाऱ्यावर मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असल्याने आहारात मासे व भात अधिक असतो.
8. कोकणात कोणत्या पिकाच्या भरपूर उत्पन्नामुळे स्वयंपाकात त्याचा वापर जास्त केला जातो?
स्पष्टीकरण: कोकणात नारळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने स्वयंपाकात खोबऱ्याचा वापर अधिक आढळतो.
9. कोकणातील स्वयंपाकात खोबऱ्याचा वापर का मोठ्या प्रमाणात आढळतो?
स्पष्टीकरण: नारळाचा स्थानिक उत्पादन मुबलक असल्याने खोबऱ्याचा वापर केला जातो.
10. कोकणात पोशाखाच्या बाबतीत कोणता प्रमुख घटक लक्षात घेतला जातो?
स्पष्टीकरण: उष्ण आणि दमट हवामानामुळे कमी कपड्यांचा वापर केला जातो.
11. कोकणातील शेतमजुरांचा पारंपरिक पोशाख कसा असतो?
स्पष्टीकरण: हवामान व जीवनशैलीनुसार पारंपरिक पंचा, जाकीट व टोपी/रुमाल वापरतात.
12. कोकणातील मच्छीमारी करणाऱ्या पुरुषांचा पोशाख कोणता आहे?
स्पष्टीकरण: पाण्यात कामासाठी हलका पोशाख – रुमाल/चड्डी, बंडी, टोपी वापरली जाते.
13. कोकणातील शहरातील पुरुषांचा पोशाख आजकाल कसा आहे?
स्पष्टीकरण: शहरी भागात शर्ट-पँट हा रूढ पोशाख आहे.
14. कोकणातील स्त्रिया सर्वसाधारणपणे कोणते वस्त्र परिधान करतात?
स्पष्टीकरण: प्रादेशिक परंपरा म्हणून स्त्रिया साड्या नेसतात.
15. कोकणातील तरुण मुलामुलींच्या पोशाखात कोणती विशेषता आढळते?
स्पष्टीकरण: तरुण पिढी विविध फॅशनेबल कपडे वापरते.
16. कोकणातील घरांची रचना कशी असते आणि त्यामागचे प्रमुख कारण कोणते?
स्पष्टीकरण: प्रचंड पावसामुळे छपरं उताराची असतात, जेणेकरून पाणी थांबत नाही.
17. कोकणातील घरासमोर कोणती वैशिष्ट्यपूर्ण जागा असते?
स्पष्टीकरण: अंगण हे कोकणातील घरांचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
18. कोकणातील डोंगराळ भागातील वस्तीची रचना कशी असते?
स्पष्टीकरण: डोंगराळ प्रदेशामुळे वस्ती विखुरलेली असते, लहान वाड्या मिळून एक गाव बनते.
19. कोकणात मुख्य व्यवसाय कोणते आहेत?
स्पष्टीकरण: पारंपरिक व्यवसाय म्हणजे शेती व मासेमारी.
20. कोकणात शेतीसाठी कोणती अडचण सर्वाधिक भासते?
स्पष्टीकरण: सपाट जमिनीचे प्रमाण कमी असल्यामुळे शेतीवर मर्यादा येतात.
21. कोकणातील मातीचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे?
स्पष्टीकरण: कोकणातील माती लाल/पिवळी आणि कमी कसदार आहे.
22. कोकणातील शेतीतून उत्पन्न कसे असते?
स्पष्टीकरण: कमी कस आणि सपाट जमीन नसल्याने उत्पन्न कमी मिळते.
23. कोकणातील अनेक लोक नोकरी किंवा इतर व्यवसायासाठी कुठे स्थलांतर करतात?
स्पष्टीकरण: कमी उत्पन्न व मुंबई जवळ असल्याने मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होते.
24. गणेश चतुर्थी, होळी या सणांच्या वेळी कोकणातील स्थलांतरित लोक काय करतात?
स्पष्टीकरण: सण-उत्सवाच्या काळात आपल्या गावी मोठ्या संख्येने परत येतात.
25. खालीलपैकी कोणते व्यवसाय कोकणात चालतात?
स्पष्टीकरण: आंबा, काजू, कोकम, फळे विक्री, औषधी वनस्पतीवर प्रक्रिया, मेंढी पालन हे उपव्यवसाय आहेत.
26. कोकणातील कोणत्या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होते?
स्पष्टीकरण: कोकणातील आंबा, कोकम, काजू, आंबापोळी, आमरस इ. देश-विदेशातही विकले जातात.
📊 Report Card
Total Questions Attempted:
Correct Answers:
Wrong Answers:
Time Spent:
Message:
🔗 Online Test Series: www.studymaxmarathi.com

📢 "Knowledge grows when shared! Use the buttons below to share this test with your friends on social media." 👇
No comments:
Post a Comment