test

MPSC Combine 2023 - Ultimate Live Test System
👤 Student
00:00
✨ Official Live Test Series

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा - २०२३

MPSC Combine Group B & C Prelims 2023 | Live Practice Mode

Live Test मध्ये तुमचे स्वागत आहे!

📝 एकूण प्रश्न: 0 | ⏱️ प्रत्येक प्रश्नाला: ३० सेकंद
तुमचे नाव टाका आणि टेस्ट सुरू करा. वेळ संपल्यास टेस्ट आपोआप सबमिट होईल.

Q No - 1
इतिहास
📌 महाराष्ट्रातील कामगार चळवळ व संघटना | बॉम्बे मिल हॅण्ड असोसिएशन (१८९०)
नारायण मेघाजी लोखंडे यांनी 'बॉम्बे मिल हॅण्ड असोसिएशन' ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते ?

अ. केशवराव बागडे, केशवराव बोले
ब. रघु भिकाजी, गेणू बाबाजी
क. नारायण सुर्काजी, विठ्ठलराव कोरगांवकर
ड. कृष्णाजी अर्जुन केळूसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार
1 (1) अ आणि ब फक्त
2 (2) ब आणि ड फक्त
3 (3) अ, ब आणि क फक्त
4 (4) ब, क आणि ड फक्त
✅ अचूक उत्तर: पर्याय (4)
महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांनी २३ एप्रिल १८९० रोजी भारतातील पहिली कामगार संघटना 'बॉम्बे मिल हॅण्ड असोसिएशन' ची स्थापना केली. या ऐतिहासिक कार्यामध्ये त्यांना गिरणी कामगार प्रतिनिधी रघु भिकाजी, गेणू बाबाजी (विधान ब), नारायण सुर्काजी, विठ्ठलराव कोरगांवकर (विधान क), तसेच सत्यशोधक समाजाचे विचारवंत कृष्णाजी अर्जुन केळूसकर, रामचंद्र शिंदे आणि नारायण पवार (विधान ड) यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Social media var aamhala follow kara @studymaxmarathi
Q No - 2
इतिहास
📌 १८५७ चा राष्ट्रीय उठाव | ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंगचे ऐतिहासिक विधान
इ.स. १८५७ च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे ________ हा गव्हर्नर जनरल म्हणाला.
1 (1) लॉर्ड डलहौसी
2 (2) लॉर्ड रिपन
3 (3) लॉर्ड माऊंटबॅटन
4 (4) लॉर्ड कॅनिंग
✅ अचूक उत्तर: पर्याय (4)
१८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या वेळी भारताचा तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग (Lord Canning) याने देशी संस्थानांच्या भूमिकेवर भाष्य करताना उद्गार काढले होते की, 'जर ग्वाल्हेरचे शिंदे आणि हैदराबादचा निजाम हे या बंडात सामील झाले असते, तर उद्याच आम्हाला आमचे गाशा गुंडाळून भारतातून पळ काढावा लागला असता.'
Social media var aamhala follow kara @studymaxmarathi
Q No - 3
इतिहास
📌 महाराष्ट्रातील सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी | प्रार्थना समाज (१८६७)
प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

अ. दादोबा तर्खडकर, डॉ. आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन, इत्यादींनी ३१ मार्च १८६७ रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली.
ब. प्रार्थना समाजामार्फत 'सुबोध पत्रिका' सुरू केली.
1 (1) अ आणि ब फक्त
2 (2) ब आणि क फक्त
3 (3) अ, ब आणि क फक्त
4 (4) ब, क आणि ड फक्त
✅ अचूक उत्तर: पर्याय (3)
३१ मार्च १८६७ रोजी मुंबईत डॉ. आत्माराम पांडुरंग, दादोबा तर्खडकर, वामन आबाजी मोडक आदींनी प्रार्थना समाजाची स्थापना केली (विधान अ सत्य). प्रार्थना समाजाने आपल्या तत्त्वांच्या प्रचारासाठी १८७३ मध्ये 'सुबोध पत्रिका' हे मुखपत्र सुरू केले (विधान ब सत्य).
Social media var aamhala follow kara @studymaxmarathi